करोनाबाबत एफबीआयच्या संचालकांचा खळबळजनक दावा

अमेरिकेच्या गुप्तचरतपास संस्थेचे (FBI) चे संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी एक धक्कादायक दाव केला आहे. करोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आमच्या तपासात उघड झाल्याचे संचालकांनी सांगितले आहे.;

Update: 2023-03-01 09:50 GMT

गेल्या काही वर्षापासून सातत्याने करोना विषाणूचा जन्म हा चीनमधील प्रयोगशाळेतून( LABORATORY) झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबतचे ठोस पुरावे जरी अजून मिळाले नसले तरी या संदर्भात अमेरिकेच्या गुप्तचर तपास संस्थेने म्हणजेच एफबीआय (FBI) ने दावा केला आहे. FBI चे संचालक क्रिस्टोफर व्रे (Christopher Wray) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. करोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान ( WUHAN )येथील प्रयोगशाळेतून झाल्याची शक्यता क्रिस्टोफर यांनी वर्तवली आहे. मंगळवारी एका अमेरिकेतील वृत्तवाहिनीला मुलाखत देताना व्रे यांनी दावा केला.

क्रिस्टोफर व्रे (Christopher Wray) यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही अमेरिकेतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असून गेल्या काही वर्षापासून करोनाच्या उत्पत्तीबाबत आम्ही संशोधन करत आहोत. या तपासादरम्यान आम्ही जी निरक्षणं नोंदवली, त्यानुसार करोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून ( LABORATORY )झाल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात कोणीही संशोधन करत असेल तर चीन सरकारकडून त्यांच्या कामात अडथळे आणले जातात.

दरम्यान, दुसरीकडे अमेरिकेच्या उर्जा विभागाने याच करोना विषाणूच्या उगमाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. या विषाणूचा उगम चीनमधील प्रयोगशाळेत झाला असून, योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या विषाणूचा प्रसार झाल्याचे उर्जा विभागाने सांगितले आहे.  

Tags:    

Similar News