जेष्ठ लेखक ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto)यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. त्यांचा जन्म वसईच्या नंदाखाल गावी झाला. फ्रान्सीस दिब्रिटो यांनी सुमारे २४ वर्षे ‘सुवार्ता’ (suvarta)या मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक पद भूषविले.
फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto)यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. १९७२ साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली होती. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए.चे शिक्षण घेतले होते.
ख्रिस्ति धर्मगुरु असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण रक्षणासाठी काम केले. त्यांनी आपल्या लेखणातून सामाजिक प्रबोधनाचे काम केले.
हरित वसई संरक्षण समिती’या नावाने त्यांनी पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. ’राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे लेखन (Father Francis D’britto) यांचे साहित्य
फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto)यांचे निधन
तेजाची पाऊले (ललित)नाही मी एकलासंघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहाससुबोध बायबल – नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)सृजनाचा मोहोरपरिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)मुलांचे बायबल (चरित्र)ख्रिस्ती सण आणि उत्सवपोप दुसरे जॉन पॉल
फादर फ्रान्सिस दीब्रिटो यांच्या जाण्याने साहित्य, पर्यावरण, धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) त्यानंतर ४ वाजेपासून पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
अंत्यविधी आज संध्याकाळी ६.०० वाजता पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे करण्यात येणार आहे.