बाप-बेटी एकाचवेळी निवडणुकीत उतरणार ; नवाब मलिक-सना मलिक नशीब अजमावणार

Update: 2024-10-20 04:56 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून याला विरोध झाला असला तरी अजित पवारांनी मलिकांना पक्षातून दूर केलेले नाही. आता नवाब मलिक मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत, तर त्यांची कन्या सना मलिक अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार आहे.

नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, कारण महायुतीतील जागावाटपात अणुशक्तीनगर आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन जागा अजित पवार गटाला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अणुशक्तीनगर मतदारसंघ अस्तित्वात आला होता, आणि तेव्हापासून येथे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात लढत होत आहे. २०१४ मध्ये कातेंनी मलिकांचा पराभव केला होता, परंतु २०१९ मध्ये मलिक पुन्हा विजयी झाले होते.

मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात सध्या समाजवादी पार्टीचे अबू आझमी आमदार आहेत, आणि इथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे नवाब मलिकांनी आबू आझमींविरोधात या मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या रणनीतीने निवडणुकीत मोठा महत्त्वाचा कल येऊ शकतो, कारण बाप-बेटी एकाचवेळी राजकारणात सक्रिय होणार आहेत.

Tags:    

Similar News