काही जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. मागील तीन दिवसात मुसळधार पावसाने हजरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, भरुन वाहत आहेत. नद्यांना पुर असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. लाखांदूर तालुक्यात आगधी शेवटच्या टोकावर ५०० लोकवस्तीच हे गाव आहे. गावाच्या चारही बाजूने चुलबंध नदीचे वाढ आहे. या गावातील विद्यार्थी छोट्या नावेतून जीवघेणा प्रवास करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही सुविधा किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.