दिल्ली येथे तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी देशात आज चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. या चक्का जाम आंदोलनामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील शेतकरी सहभागी होणार आहेत.
दिल्ली येथे २६ जानेवारीला झालेल्या कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजधानी दिल्लीत ५० हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पॅरामिलिटरी आणि राखीव दलाचा जवानांचा समावेश करण्यात आला आहे. हे आंदोलन दुपारी १२ ते ३ दरम्यान करण्यात येणार आहे. त्यानुसार देशातील अनेक राज्यमार्ग बंद करण्यात आले आहेत. शेतकरी अत्यावश्यक सेवेतील लोकांना चक्का जाममधून सोडत आहेत.
कुठं कोणता मार्ग बंद....
शेतकऱ्यांनी जम्मू-पठानकोट हायवे वर चक्का जाम आंदोलन करत रस्ता बंद केला आहे.
ईस्टर्न पेरिफेरेल एक्सप्रेस-वे बंद
शेतकऱ्यांनी पलवल बॉर्डरवर चक्का जाम करत आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी सोनिपत येथे ईस्टर्न पेरिफेरेल एक्सप्रेस-वे बंद केला आहे. याबरोबरच अमृतसर-दिल्ली नॅशनल हायवे, शाहजहांपुर (राजस्थान-हरियाणा) बॉर्डर जवळ राष्ट्रीय राजमार्ग जाम केला आहे.