मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वेदनेची महाआरती आंदोलन; शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Update: 2022-05-04 14:31 GMT

सर्वच धार्मिक मुद्द्यांवरुन गोंधळ सुरु असताना सरकारने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्या , शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळाव्या म्हणून आज मुंबईमध्ये मंत्रालयात जवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर परभणीचे शेतकरी नेते माणिक कदम व विनायकराव पाटील यांच्यासह अनेकांनी शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती आंदोलनात सहभाग नोंदवला.




 


सध्या राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे व जातीवादाचे आरोप करून भांडत आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्याने कोणाकडे न्याय मागावे हेच कळत नाही. भोंगे,हनुमान चालीसा, हिंदू मुस्लिम हे शेतकऱ्यांचे मुद्दे नाहीत शेतमालाला हमी भाव नाही, वीज नीट चालत नाही, ऊसाचा प्रश्न गंभीर झालाय व दररोज होणारी इंधन वाढ व महागाई या मुळे शेतकरी चिंतेत आहे .राजकीय संघर्षाच्या गोंधळामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कोणाचेच लक्ष नाही शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळाव्या म्हणून या आंदोलनात शेतकऱ्यांकडून धान्य फळे भाजीपाला भेट देऊन तेलंगणाच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी करण्यात आली होती.





 


 


तसेच राज ठाकरे देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या घरासमोर अतिशय शांततेच्या मार्गाने महाआरती करण्यात येणार होती परंतु मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोडून देण्यात आलं.

Tags:    

Similar News