ऊस दराबाबत शेतकरी आणि प्रशासन बैठक निष्फळ

Update: 2021-10-27 10:59 GMT

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊस दराबाबत कारखानदारांनी शेतकऱ्यांची FRP बुडावणाऱ्या साखर कारखानदारांना मस्ती आली आहे , त्यामुळे या साखर कारखानदारांची मस्ती उतरवण्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकवटल्या आहेत.असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी म्हटले आहे.

सोबतच पुढे बोलताना ते म्हणाले की, FRP चे तुकडे करणाऱ्यांचे शेतकरी संघटना तुकडे करणार असल्याचे ते म्हणाले. सातारा जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत FRP बाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना संतप्त झाल्या असून , त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या ऊसाची FRP द्यायला सहकार आयुक्तांना जमत नसेल तर अशा साखर कारखाने सोडावेत शेतकरी साखर कारखाना चालवण्यासाठी खंबीर आहेत. शेतकऱ्यांनी उभा केलेला कारखाना शेतकरी एक रकमी FRP रक्कम देऊन चालवून दाखवेल असं जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हटले आहे.

Tags:    

Similar News