बजाज चौकतील शेतकरी आंदोलनाला तब्बल 250 दिवस पूर्ण

वर्धा शहरातील बजाज चाैकात गेली 250 दिवसांपासून शेतकरी कामगार धरने आंदाेलन करत आहे. केंद्राचे तीन शेतकरी कायदे रद्द करण्याची मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिला आहे.

Update: 2021-08-22 05:50 GMT

वर्धा : वर्धा शहरातील बजाज चाैकात गेली 250 दिवसांपासून शेतकरी कामगार धरने आंदाेलन करत आहे. केंद्राचे तीन शेतकरी कायदे रद्द करण्याची मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसरचिटणीस तुकाराम भस्मे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आंदाेलनस्थळी भेट देत जाहीर पाठींबा दिला आहे.

या आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. 2020 पासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून नेमकं काय काय घडलं,आणि कशाप्रकारे मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाब मधील शेतकऱ्यांनीही वर्ध्यातील आंदोलनाला भेट दिली, विविध घडामोडी या 250 दिवसात आंदोलकांनी अनुभवल्या.

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला.

Tags:    

Similar News