MaxMaharashtra Impact: शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या सीताबाई तडवी यांच्या कुटुंबीयांना अखेर मदत
शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या पहिल्या महिला शेतकरी सीताबाई तडवी यांच्या कुटुंबाला मॅक्समहाराष्ट्राच्या वृत्तानंतर अखेर मदत मिळणार आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने वृत्त दिलं होतं.
नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबारी येथील रहिवासी सिताबाई तडवी (वय 56) याचं शेतकरी आंदोलना दरम्यान प्रवास करताना निधन झालं. कोरोना काळात त्यांना वेळेवर उपचार मिळाले नव्हते. महाराष्ट्रातील हवामान आणि दिल्लीतील हवामानात मोठा फरक आहे. सीताबाई तडवी यांना या बदलेल्या हवामानाचा त्रास झाला. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्या१६ जानेवारीपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 26 जानेवारीला दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. सीताबाई तडवीच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी प्रतिभा शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्यापर्यंत तडवी यांच्या कुटुंबीयांना मदत केली नाही.
दरम्यान मॅक्समहाराष्ट्र ने या संदर्भात तडवी यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नसल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर संयुक्त त्यांना मोर्चा च्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. आणि संयुक्त किसान मोर्चाने तडवी यांना मदत देण्याचा निर्णय घेतला.
तडवी यांच्या कुटुबियांना संयुक्त किसान मोर्चा मध्ये शेतकऱ्यांना आरोग्याची सुविधा पुरवणारे डाॅ. स्वाभिमान सिंह ५ लाखाची मदत करणार आहे. सदर कुटुंबाला राज्यशासन कोणतीही मदत करत नाही. याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत शेतकऱ्यांना भरपाई द्या, गुन्हे मागे घ्या. अशी मागणी करतात. मात्र, महाराष्ट्रात सत्तेत असलेले हे पक्ष सीताबाईला मदत करत नाही. महाराष्ट्र सरकारने कृती केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील आंदोलक शेतकर्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेतले पाहिजेत. अशी मागणी यावेळी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.