तर शेतकऱ्यांचा उद्रेक दिल्लीपुरता मर्यादित राहणार नाही: शरद पवार

Update: 2020-12-06 07:41 GMT

दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन तीव्र होत असताना शरद पवारांनी मोदी सरकारला इशारा देऊन हे दिल्लीपुरतं मर्यादित राहणार असा इशारा दिला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी गहू उत्पादित केल्याचा फायदा इतर ठिकाणी होतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे तसेच केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असं शरद पवार म्हणाले.

मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांचे जत्थे दाखल होत आहेत. तर दुसरीकडे चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारला शेतकऱ्यांचं समाधान करण्यात अपयश आलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर या भेटीत चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी पंजाब आणि हरियाणा आणि इतर राज्य गहू मोठय प्रमाणात उत्पादित करत असल्याचे सांगितले. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी गहू उत्पादित केल्याचा फायदा इतर ठिकाणी होतो, असंही शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे तसेच केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

जो शेतकरी कायदा केला आहे, त्याबाबत सरकारने चर्चा केली पाहिजे होती. ती केली गेली नाही घाई घाईत निर्णय घेतला गेला, असल्याचंही शरद पवार म्हणाले. तर शेतकऱ्यांचा उद्रेक दिल्लीपुरता मर्यादित राहणार नाही: शरद पवार 

Tags:    

Similar News