शेतकरी आंदोलनाचा निर्धार कायम....
केंद्र सरकारनं देशात लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सिंघु सीमेवर सलग तेविसाव्या दिवशी शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या आंदोलना शेतकऱ्यांनी निर्धार कायम ठेवला असून टोलबंद आंदोलन आणि जगभरात भारतीय दुतावासांबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल असा निर्धार केला.;
राजधानी दिल्लीतील सिंघु सीमवेर गेली तेवीस दिवस शेतकरी आंदोलन सुरु आहे. कायदे मागे घेतल्यखेरीज आंदोलन हटणार नाही अशी शेतकऱ्याची भुमिका आहे. आज झालेल्या पत्रकार परीषदेत शेतकरी संघटनांनी अदानी- अंबानी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. परदेशातील प्रत्येक भारतीय दुतावासाबाहेर भारतीय लोक आंदोलन करतील. टोल बंद आंदोलन सुरु राहील असं यावेळी जाहीर करण्यात आलं.
केंद्र सरकारकडून चर्चेसाठी आलेल्या आमंत्रणाबाबत बोलताना शेतकरी नेते म्हणाले, सर्व संघटनांशी चर्चा झाल्याशिवाय चर्चेचा अंतिम निर्णय होणार नाही. आम्ही जिओ वर बंदी घातल्यामुळे पहिल्या क्रमांकावर ते आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येऊ नये असे आम्ही आवाहन केले आहे.
लाखो लोक रस्त्यावर आंदोलन करत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे आमंत्रण स्विकारु नये असे या शेतकरी नेत्यांनी सांगितले. या शेतकरी आंदोलनात अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आंदोलना सोबत आहे. जगभरातील भारतीय दूतावासाच्या बाहेर पंजाबी आंदोलन करतील.मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाविरोधात प्रपोगंडा मांडला आहे त्याचे उत्तर आम्ही किसान एकता मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत, लवकरच शेतकरी कायद्यांबाबत वेबसेमीनार आयोजीत केला जाईल असं यावेळी सांगण्यात आलं.