शेतकरी आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक

शेतकरी आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक;

Update: 2021-01-31 08:07 GMT

शेतकरी आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्य़ा मुक्त पत्रकार मनदीप पुनिया (Mandeep Punia) यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात आईपीसी कलम 186, 323 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

पुनिया यांच्यावर सिंघू बॉर्डरवरील दिल्ली पोलिसांचे एसचओ शी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पुनिया यांच्यासह दुसरे पत्रकार धर्मेंद्र सिंह यांना देखील अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना आज सकाळी 5:30 वाजता सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पुनिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्तांनी याची पुष्टी केली आहे.

धर्मेंद्र सिंह यांच्याकडून भविष्यात पोलिसांशी कोणतंही गैरवर्तन केलं जाणार नाही. असं लिखित स्वरुपात घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. तर मनदीप पुनिया यांना दुपारनंतर कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

कधी झाली होती अटक...?

30 जानेवारी 2021 ला सिंघू बॉर्डरवर हे दोनही पत्रकार वार्ताकन करत होते. यावेळी हे पत्रकार बंद असलेल्या रस्त्याच्या दिशेनं जात होते. यावेळी त्यांना ताब्य़ात घेण्यात आले.

पुनिया यांचा लाईव्ह व्हिडीओ आणि अटक

मुक्त पत्रकार पुनिया यांना अटक केल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी त्यांना घेरलं असल्याचं यातून दिसून येतं. या अटक होण्याअगोदर पुनिया यांनी फेसबूकवर एक लाईव्ह केलं होतं. या लाईव्ह मध्ये त्यांनी कशा प्रकारे स्थानिक होण्याचा दावा करणारे लोक पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन स्थळावर दगड फेक करत आहेत. हे सांगितलं होतं.

Full View

Tags:    

Similar News