प्रसिध्द गायक तथा गझलकार पंकज उधास यांचे आज (26 फेब्रुवारी) रोजी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले आहे. पंकज उधास हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. "चिठ्ठी आई है, वतन से चिठ्ठी आई है" या गाण्याने त्यांना प्रसिध्दी मिळाली आणि त्यांची ओळख निर्माण झाली.
पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूरमध्ये झाला. तीन भावांमध्ये ते सगळ्यात लहान होते. त्यांचं कुटूंब राजकोटमधील चरखाडी गावातील एका कसब्यात रहात होते. त्यांचे आजोबा जमीनदार आणि भावनगर संस्थानाचे दिवाणही होते. त्यांचे वडील केशुभाई उधास हे सरकारी कर्मचारी होते. त्यांना इसराज वाजवण्याची खूप आवड होती. आई जितुबेन उधास यांना गाण्याची खूप आवड होती. यामुळेच पंकज उधास आणि त्यांच्या दोन्ही भावांचा संगीताकडे नेहमीच कल होता.
गझल गायक पंकज उधास यांच्या जाण्याने बॉलीवूड विश्वात शोककळा पसरली असून गझलप्रेमींसाठी ही अत्यंत दुःखाची बाब आहे.