डॉ.स्वप्नील शिंदे यांची आत्महत्या नसून हत्या, प्रकरणाची सीबीआय चौकशीची कुटुंबीयांची मागणी
डॉ. स्वप्नील शिंदे प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 17 ऑगस्ट रोजी नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये शिंदे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.
डॉ. स्वप्नील शिंदे प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 17 ऑगस्ट रोजी नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये शिंदे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.
दरम्यान या प्रकरणात राजकीय दबाव आणला जात असून स्वप्निलला न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. स्वप्नीलच्या वरिष्ठांकडून त्याला त्रास दिला जात होता, याबाबत कॉलेज प्रशासनास माहिती देऊन देखील कोणतीच कारवाई झाली नाही, आणि त्याचाच बळी म्हणजे स्वप्नीलचा असल्याचं त्याचे कुटुंबीयांचं म्हणणे आहे.
स्वप्नीलची आत्महत्या नसून हत्या केल्याचा संशय यापूर्वीच त्यांनी केला होता, त्यानंतर चार दिवस उलटले असं असले तरी यामध्ये अजूनही परिवारापर्यंत कुठलीच माहिती पोलिस प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे आमचा पोलिस प्रशासनासह कुठल्याही यंत्रणेवर विश्वास नाही, त्यामुळे स्वप्निलच्या मृत्यूच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी स्वप्नीलचा आई-वडिलांनी केली आहे.