अफवांवर विश्वास ठेवू नका, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

Update: 2022-03-08 07:19 GMT

सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.वेतनवाढीवर निर्णय झाला असला तरी एस टी कर्मचारी विलिगीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.सरकारने वारंवार सुचना देऊन ही कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.त्यातुनच आता एस टी महामंडळाच्या नावाने खोटे परिपत्रक व्हायरल झाले आहे.

संपात सहभागी असलेले एसटीचे कर्मचारी कामावर रुजु झाल्यानंतर त्यांच्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार प्रमादीय कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र समाज माध्यमावर फिरत आहे.परिपत्रकाद्वारे कर्मचाऱ्यांना दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत रुजू होण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे पत्र व्हायरल झाले आहे.तर हे पत्र खोटे असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहिर केले आहे.

अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही,शिवाय अशा प्रकारचे कोणतेही निर्णय झालेले नाही.बोगस पत्र जारी करुन कोणीतरी कामगाऱांच्या भावनेशी खोडसाळ पणा करत आहे.कामगारांनी अशा पत्रांवर विश्वास ठेवु नये.कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल.अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे.असे सादर केलेल्या परिपत्रकाद्वारे म्हटले आहे.

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय राज्य सरकार काहीही करु शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एसटी कर्मचारी संपाबाबत मांडली. एसटी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यात आली आहे, त्यांनी विद्यार्थी, सर्व सामान्यांची होणारी गैरसोय याचा विचार करावा, टोकाची भूमिका घेण्याची वेळ आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags:    

Similar News