आरक्षण हे वंचित घटकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणून समाजातील विषमता, अन्यायी व्यवस्था नष्ट करण्याचा एक उपाय आहे. मात्र, समाजातील सवर्ण समाज सत्ता, संपत्ती आणि अधिकार वापरून मागास जातीची बनावट जात प्रमाणपत्र बनवून त्यांचे हक्क आणि प्रतिनिधित्व लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच खासदार नवनीत राणा यांनी 'मोची' जातीचे बनावट प्रमाणपत्र बनविल्याचे समोर आले, या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी 'जातप्रमाण पत्राचे राजकारण आणि जातीयवाद' या विषयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष Adv. सुरेश माने, Adv असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार राज असरोडकर यांच्याशी विशेष बातचीत केली.