फडणवीस, खोटं बोलणं थांबवा..!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे 1250 मे.टन आहे
केंद्राच्या मान्यतेने प्राप्त होत असलेला अॉक्सिजन
भिलाई 110 मे.टन /दिन
बेलारी 50 मे.टन /दिन
जामनगर 125 मे.टन/दिन
व्हायजॅग - 60 मे.टन सरासरी
ऑक्सिजन एक्सप्रेसने 7 टँकरने एकदा 110 मे.टन आणले आहे. महाविकास आघाडी सरकारने 15 ते 30 एप्रिल या 15 दिवसांत 25000 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. 17500 मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला 7500 मे.टन म्हणजे 500 मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु 345 मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी logistics अडचणी येत आहेत, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.