धारावीत गॅस सिलिंडरचा स्फोट ;14 जण होरपळले

Update: 2021-08-29 10:58 GMT

मुंबई :धारावीतील शाहू नगरात एका घरात गॅस सिलिंडर स्फोट होऊन झालेल्या स्फोटात 14 जण होरपळले आहेत. त्यातील 12 जण किरकोळ भाजले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

धारावीच्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28 च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन अग्निशमन बंब आणि एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

Tags:    

Similar News