मोदी सरकारच्या नव्या धोरणाने भारत कधी खाद्यतेलात आत्मनिर्भर होणार?: विजय जावंधिया
भारत सरकारने जेव्हा खरीपाचं सोयाबीन, सरकी, कॉटन सीडस्, भूइमुग ही पीक बाजारात आल्यानंतर मोदी सरकारने खाद्य तेलाचे भाव वाढले आहेत. महागाई वाढली आहे. असं कारण देत साठेबाजीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ऐन शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे खाद्यतेलासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन, सरकी, कॉटन सीडस्, भूइमुग या पिकांना भाव मिळणार नाही. परिणामी शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळण्याची भीती आहे.
या संदर्भात आम्ही ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले सरकारचं जर असंच धोरण सुरु राहिलं तर भारत तेल उत्पादनात कधी आत्मनिर्भर होईल याचा विचार करावा... असा सल्ला सरकारला दिला आहे.