Atique Ahmad : युपीत कायदा सुव्यवस्था आहे का? अतिक, अशरफच्या हत्येवरून सोशल मीडियावर सवाल

UP Police : माजी खासदार अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त असतानाही त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Update: 2023-04-16 05:37 GMT

Atique Ahmad : अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आलं आहे. मात्र तरीही पोलिसांचा बंदोबस्त असताना अतिक आणि अशरफची हत्या (Asharaf Ahmad Shot) करण्यात आल्याने उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Law and Order in UP)

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना उत्तर प्रदेश पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. तेव्हा पत्रकारांनी अतिक आणि अशरफला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी अतिक अहमद यांना गुड्डू मुस्लिमच्या (Guddu Muslim) अंत्ययात्रेला गेले नाहीत. त्याबाबत काय सांगाल? असा सवाल करण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देतांना अतिक अहमद म्हणाले की, 'नहीं ले गए तो नहीं गए'. यापुढे उत्तर देण्यापुर्वीच अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद जागीच कोसळले. तर पोलिस शिपाई मान सिंह (Man Singh) यांनाही गोळी लागली आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले. मात्र हल्लेखोर घोषणा देत होते. परंतू अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची पोलिस बंदोबस्त असताना हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Atique ahmad Shot on the front of police)

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, विसरु नका. पुलवामावर पांघरूण घालण्यासाठी एन्काऊंटर किलींग आहे. पण मूळ प्रश्न 20 हजार कोटी कुठून आले हा आहे.

Live camera समोर पोलिसांच्या ताब्यात असताना गोळी घालून हत्या...म्हणजे पोलिस किती सक्षम आहेत आणि कायदा कसा राबवतो,असा इतरांना थेट इशारा आहे..

देशातील सगळ्यात मोठ्या राज्यातील ही परिस्थिती आहे...हेच कायद्याचे राज्य आहे! हा इशारा आहे. इतका निघृण व्हिडीओ शेअर करू नका, असं पत्रकार रश्मी पुराणिक यांनी म्हटलं आहे.

अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर स्टेट टेररिझम, कायदा आणि सुव्यवस्था दिसत नाही, असं जितेंद्र आव्हा यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News