...आणि त्यांच्यासाठी माजी मंत्री ठाकूर यांनी घेतली शिलाई मशीन हाती

Update: 2022-09-16 14:54 GMT

कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं असा विचार जनमाणसात रुजविणाऱ्या माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज स्वत: शिलाई मशीन चालवून मोर्शीमधील महिलांना शिवणकामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं असा विचार जनमाणसात रुजविणाऱ्या माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज स्वत: शिलाई मशीन चालवून मोर्शीमधील महिलांना शिवणकामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचलित नवतेजस्विनी आधुनिक शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. यावेळी सर्व महिलांना मार्गदर्शन करताना ठाकूर यांनी थेट शिलाई मशीनची धुरा हाती घेतली. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा या प्रमुखउद्देशाने ठाकूर यांनी मशीन चालवूनही दाखवत शिवणकामाचे प्रात्यक्षित दाखविले.

महिला आर्थिक विकास महामंडळ, अमरावती द्वारा संचलित मोर्शीमधील झेप लोकसंचलित साधन केंद्र नेरपिंगळाई, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, लेहगाव यांच्यावतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत नवतेजस्विनी आधुनिक शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते पार पडले. यावेळी आयोजित वार्षिक सार्वसाधारण सभेत ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मोर्शीमधील झेप लोकसंचलित साधन केंद्र नेरपिंगळाई, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, लेहगावचे सर्व प्रशिक्षणार्थी आणि महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे आदी उपस्थित होते.

Tags:    

Similar News