अनिल देशमुखांच्या अटकेतील सहकाऱ्यांची कोठडी आज संपणार, EDच्या भूमिकेकडे लक्ष

Update: 2021-07-01 04:53 GMT

मनी लाँडरिंग प्रकरणी अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे PA आणि PS कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना EDने अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या सुनावणीमध्ये इडी कोर्टाला काय माहिती देईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान ED ने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आङे. पण ते दोनवेळा अनुपस्थित राहिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची मागणी देशमुख यांची मागणी ED ने फेटाळून लावली आहे. पण आपले वय पाहता आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता आपण EDच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, असे देशमुख यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता ईडी देशमुख यांना पुन्हा चौकशीसाठी कधी बोलावणार आणि देशमुख उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सचिन वाझे याने बारमालकांकडून गोळा केलेले पैसे देशमुख यांनी बनावट कंपन्यांद्वारे त्यांच्या ट्रस्टमध्ये वळते केल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच देशमुख यांच्या घरांवर छापे टाकून कारवाईल केल्यानंतर त्यांचे पीए आणि पीएस यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे आचता ईडीची पुढची कारवाई काय असेल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News