कॉंग्रेसच्या माजी खासदाराची पक्षविरोधी मागणी : CAA कायद्यात दुरुस्तीची केली मागणी

Update: 2021-10-19 07:04 GMT

केंद्र सरकारच्या CAA-NRC ला कडाडून विरोध करणाऱ्या कॉंग्रेसच्या धोरणाविरोधात जात कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी CAA कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. नुकतचं बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोडच्या घटना घडल्या आहेत.

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यावर प्रतिक्रीया देताना भारतालाच इशारा दिला होता. त्या म्हणाल्या, जगभरात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. केवळ आपला देशच नाही तर शेजारील देशांनीही याबाबत सावध असले पाहिजे. भारताने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्हाला खूप मदत केली आहे आणि यासाठी आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहू. परंतु भारतात देखील असे काही होऊ नये ज्यामुळे त्याचा आपल्या देशावर परिणाम होईल. आपल्या देशातील हिंदू समाजाच्या लोकांना नुकसान होईल, अशा घटना घडू नयेत म्हणून थोडी काळजी घेण्याची गरज आहे, असं शेख हसीना म्हणाल्या होत्या.

बांगलादेशातील हिंसेप्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली असून, आणखी हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. चारशे जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस ज्या ठिकाणी उभे होते, ती ठिकाणे सोडून हल्लेखोरांनी इतर ठिकाणे जाळली आहेत.

या हल्ल्यांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढू लागल्याची टीका होऊ लगली आहे. भाजप आणि उजव्या विचारणीच्या संघटनांकडून सोशल मिडीयावरुन तीव्र निषेध केला जात आहे.

बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढू लागल्याची टीका होऊ लगली आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याची मागणी ट्विट करुन केली आहे.

मिलिंद देवरा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बांगलादेशमध्ये वाढणारी सांप्रदायिक हिंसा अत्यंत चिंताजनक आहे. धार्मिक छळापासून पळून जाणाऱ्या बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी CAA मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. भारतीय मुस्लिमांना बांगलादेशी इस्लामवाद्यांशी बरोबरी करण्याचा कोणताही सांप्रदायिक प्रयत्न भारताने नाकारला पाहिजे."

कॉंग्रेसनं यापुर्वीच्या काळात CAA-NRC ला कडाडून विरोध केला आहे. समाजात विघटन करणाऱ्या या सरकारी प्रयत्नांचा प्रत्येकानं विरोध केला पाहीजे असं कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी यापूर्वीच म्हटलं आहे.

भाजपाने देखील बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवल्याचं जात असल्याचं म्हटलं आहे, "बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असून इथे सीएए या मानवतावादी कायद्याचे महत्त्व पुन्हा दर्शवत आहे. सीएएला ममता बॅनर्जींचा विरोध आणि आता बांगलादेश हिंसाचाराचवर त्यांचं मौन याची पश्‍चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हिंदूंना चिंता वाटली पाहिजे. ज्यांना तृणमुल सरकारमुळे अनेक समस्या आणि उपेक्षाला सामोरे जावे लागत आहे," असे भाजपा प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले.

माजी खासदार मिलिंद देवरा यांची ही पहिलीच पक्षविरोधी भुमिका नाही. यापुर्वीच्या काळात देखील ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जात असून दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी अनेकवेळा भाजपधर्जीनी भुमिका घेऊन पक्षाला अडचणीत आणलं आहे.

मिलिंद देवराचं ट्विट अनेक भाजप नेत्यांच्या हॅंडलवरुन प्रसारीत झाल्यानंतर मिलिंद देवरांना अनेकांकडून ट्रोल करण्यात आलं. देवरा म्हणजे कॉंग्रेसमधले छुपे संघी असल्याची टिका झाली आहे. त्यानंतर आज सकाळी याबाबत स्पष्टीकरण देत मिलिंद देवरांनी नवं ट्विट केलं आहे. त्यामधे ते म्हणतात, CAA हे निवडणुका जिंकण्यासाठी केलेलं ढोंग (गिमिक) होतं. यातून उपखंडातील कोणत्याही अल्पसंख्यांकाचं रक्षण झालेलं नाही. दोन वर्ष कायदे मंजूर करुन अद्याप नियम निश्चित केले नाहीत. सांगा कोण्या एका अफगान, शिख, किंवा बांग्लोदेशी हिंदूला CAA मधून नागरीकत्व दिलयं? Talk is cheap असं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

बांगलादेशात गेल्या आठवड्यात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांचा विध्वंस करण्यात आल्याच्या घटनांविरुद्ध अल्पसंख्याक हिंदूंची निदर्शने सुरू असतानाच; समाजमाध्यमावरील एका कथित ईश्वरनिंदात्मक पोस्टच्या मुद्यावर जमावाने बांगलादेशातील हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान केले असून, किमान २० घरे पेटवून दिली आहेत. शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जाळपोळ करण्याची ही घटना रंगपूर जिल्ह्याच्या पीरगंज उपजिल्ह्यातील एका खेड्यात रविवारी उशिरा घडली. या प्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News