पिंपरी चिंचवड शहर हे देशांतील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे-आयुक्त राजेश पाटील

Update: 2021-09-25 04:25 GMT

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर हे देशांतील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी धडक कारवाई पथकाने सातत्य ठेवावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. धडक कारवाई पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शहरातील नागरिकांची जगण्याची गुणवत्ता विकास कामांच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली नैतिक जबाबदारी व भान ठेवून काम करावे. एकसंघपणे सर्वांनी काम करून येत्या वर्षात पिंपरी चिंचवड हे शहर देशांतील सर्वात सुंदर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त शहर बनवण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

यासाठी ३२ प्रभागासाठी ३२ धडक कारवाई पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते २.३० व २.३० ते ९.३० अशा दोन पाळ्यांमध्ये पथकातील कर्मचा-यांनी काम करावे अशाही सूचना त्यांनी दिल्या. या पथकाने सातत्याने गस्त घालावी व कारवाई करावी.

येत्या दोन महिन्यात सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले. या शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या मोहिमेमध्ये बीट निरीक्षक व कर्मचा-यांना अडचणी येतील परंतु त्यावर मात करुन हे ध्येय गाठावे. वेळप्रसंगी माझ्यासह सर्व अधिकारी तुमच्या बरोबर असतील असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले

Tags:    

Similar News