आम्ही गांधींना सोडलं नाही तर तुम्ही कोण? हिंदू महासभेच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना धमकी
'आम्ही गांधींना नाही सोडलं तर तुम्ही कोण आहात?'' हिंदू महासभेचे नेते धर्मेंद्र यांनी अशी धमकी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिली आहे. त्यांच्या या धमकीनंतर त्यांना आणि त्यांच्यासह असलेल्या दोन जणांना मेंगलुरु पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदू महासभा संघटनेचे राज्य महासचिव धर्मेंद्र यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वर मंदिर पाडण्यावरून टीका करताना धमकी दिली होती.
धर्मेंद्र यांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजप सरकार पुन्हा एकदा अडचणीत आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मैसूर मधल्या नंजनगुढ येथील एक मंदिर तोडल्याप्रकरणी कर्नाटक सरकारवर टीका केली जात आहे.
नेमकं काय म्हटलं होतं धर्मेंद्र यांनी? काय आहे प्रकरण?
अंगणवाडीतील मुलांना अंडी (egg) वाटण्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा उल्लेख करताना धर्मेंद्र यांनी सरकारवर टीका केली होती.
बसवराज बोम्मई, बीअस येदियुरप्पा आणि शशिकला जोले यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. तुम्ही अंडे चोरून पैसे कमावले आहेत. कमीत-कमी मंदिरांना तरी सोडा. आम्ही अंडी घोटाळ्यासंदर्भात तुमच्या विरोधात कोर्टात गेलो आहोत. असं भाष्य धर्मेंद्र यांनी केलं होतं. याच दरम्यान त्यांनी 'आम्ही गांधींना नाही सोडलं तर तुम्ही कोण?'
अशी धमकी मुख्यमंत्र्यांना दिली होती. यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान महात्मा गांधी यांच्या हत्या संदर्भात मीडियाशी बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितलं की, बोलण्याचा उद्देश मुख्यमंत्र्यांनी धमकी देण्याचा नव्हता. हे वक्तव्य रागातून आलं होतं.
धर्मेंद्रसह त्यांच्यासोबत असलेले राजेश पवित्रन आणि प्रेम पुलाली यांना पोलिसांनी अटक केली आहे. मेंगलुरु पोलिसांनी त्यांच्या विरोधात आईपीसी कलम 120 बी, 153 ए (धर्म, जाति, जन्म स्थान, निवास, भाषा च्या आधारवर विविध समूहांच्यामध्ये द्वेष पसरवणे) सह अन्य कलम लावत गुन्हा दाखल केला आहे.