डायसाण फाऊंडेशनच्या रक्तदान आणि नेत्रदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Update: 2023-09-13 14:00 GMT

मानवी रक्त कुठल्याही फॅक्टरीत बनत नाही. ते फक्त मानवी शरिरातच बनते. मात्र वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांचा जीव जातो. त्यामुळे डायसाण फाऊंडेशनने रक्तदान आणि नेत्रदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे इथल्या वागळे इस्टेटमधील सुप्रिमसी २ या इमारतीत हे शिबिर संपन्न झालं. या कार्यक्रमासाठी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सुप्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक विजू माने, नेत्रदान राष्ट्राची गरज या अभियानाचे श्रीपाद आगाशे, सुप्रीमस -२ ठाणे कमर्शियल प्रिमायसेस चे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ५ अवयव दात्याने मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरून दिला. याशिवाय रक्तदान आणि नेत्रदानाचे महत्त्व यावेळी तज्ज्ञांनी उपस्थितांना पटवून दिले. दिग्दर्शक विजू माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा म्हणून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो, त्या निमित्ताने दृष्टिहीन व्यक्तींना दृष्टीची संजीवनी देण्यास नेत्रदान है जीवनाचे अमूल्य वरदान आहे. "रक्तदान श्रेष्ठदान" पवित्र श्रावण महिना आणि दहीहंडीनिमित्य रक्तदान करून सामाजिक बांधिलकी आणि देश भक्तीचे प्रतीक म्हणून नेत्रदान व रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे डायसाण फाऊंडेशनचे अतुल तारासिंग राठोड यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला सुरेश रेवणकर हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहून रक्तदानकर्त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत १५१ वेळा रक्तदान केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. भारतातील ३० लाख माणसं नेत्रापासून वंचित आहेत. जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतंय ही शोकांतिका आहे. श्रीलंकेसारखा देश जगाला नेत्रदान करतो. त्यामुळे जास्तीत जास्त नेत्रदान करण्याची गरज आहे, असे आवाहन श्रीपाद आगाशे यांनी यावेळी केले.

आपण जिवंत असेपर्यंत कोणाला उपयोगी पडतो किंवा नाही पडतो ते माहित नाही. परंतू मृत्यूनंतर तरी उपयोगी पडूया असा संदेश प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी दिला. तसेच डायसाण फाऊंडेशन सामाजिक क्षेत्रात खुप चांगलं काम करत आहे. भविष्यातही फाऊंडेशनला मदतीसाठी मी तयार असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं.

रक्त दान हे श्रेष्ठदान आहे. मी नियमित रक्तदान करतो तसेच आमच्या सहकाऱ्यांना देखील रक्तदान करण्यासाठी तयार करतोय. आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान शिबीरे घेत असतो. आणि आज या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मला डायसाण फाऊंडेशनने दिल्याबद्दल ठाणे शहराच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी फाऊंडेशनचे आभार मानले. राजयोगी श्री संजयजी मिरगुडे अध्यक्ष धर्मवीर मानवसेवा संघ महाराष्ट्र राज्य हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून उपकृत्य केले. राजेश शर्मा यांनी देखील मोलाच योगदान या शिबिरासाठी दिलेर. तसेच पल्लवी ब्लड बॅंक आणि त्यांची टीमच सहकार्य खुप मोलाचं ठरलं. संपूर्ण शिबीर यशस्वी करण्यामागे डायसाण फाऊंडेशनचे सर्व सहयोगींचा सहभाग लाभलाdyson foudation, foundation, donating, organdonation, eye donation, blood donation

Tags:    

Similar News