Bail Pola:वर्ध्यात नागरिक घरीच बनवतात मातीची बैलजोड

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-09-06 07:10 GMT
Bail Pola:वर्ध्यात नागरिक घरीच बनवतात मातीची बैलजोड
  • whatsapp icon

पोळ्याला बैलांचे खांदा तुपाने शेकवली जातात,त्याला विशेष असे महत्व आहे. तीच परंपरा जपत वर्ध्यात पोळा सणाला सुरुवात झाली आहे. रंगीबेरंगी बैलजोडींच्या मूर्तीने बाजारपेठ सजलेली बघायला मिळत आहे. वर्ध्यातील अनेक नागरिकांनी खर्च टाळत घरच्या घरीच बैलजोडी बनवून परंपरा जपली आहे, युवा वर्गाने देखील या परंपरेला मान देत गणपतीची मूर्ती घरी विसर्जन करून ती माती जपून ठेवत पोळ्याला बैल जोडी बनवत इकोफ्रेंडली पोळा साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

पोळ्याला बैलजोडीची खांदा शेकवणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली विदर्भाची परंपरा आहे. विदर्भात जवळजवळ सर्व घरी बैलांची खांदा शेकत हर हर महादेवाचा गजर केला जातो.

वर्ध्यात काही घरी स्वतः बैलजोडी बनवून त्याची पूजा करणे पवित्र मानले जाते, त्यामुळे खर्चाची बचत आणि कलेलाही यातून संधी मिळेल असा हा उपक्रम राबवत कृषिप्रधान भारतात कृषी म्हणजे मातीला महत्व देऊन पोळा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News