शिक्षणमंत्री हटवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना हटवण्यासाठी औरंगाबाद शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वेळेत निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

Update: 2021-07-27 10:00 GMT

औरंगाबाद : राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना हटवण्यासाठी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्यावतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्र इंग्रजी स्कूल संस्था चालक संघटनेच्यावतीने अनेक मागण्या शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या , मात्र शिक्षण मंत्री याकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत कोरोना महामारीपासून इंग्रजी शाळांना खूप वाईट दिवस आल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाने इंग्रजी शाळेत 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी शासन परतावा देणार होतं, मात्र आजपर्यंत कोणताच परतावा इंग्रजी शाळांना मिळाला नाही. आताच्या शिक्षण मंत्र्यांना निर्णय घेता येत नसल्याने संस्थाचालक संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री हटाव आंदोलन हाती घेण्यात आलं असून, येत्या 15 ऑगस्टपासून तीव्र करण्याचा असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज यांच्यावतीने प्रदेश अध्यक्ष यांनी दिला आहे.

एकीकडे आपला देश 75 वा स्वतंत्र्य दिन साजरा करणार आहेत त्यात आमच्या सारख्या संस्थाचालकांचे परतावे थांबून आम्हाल आमच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात असल्याने ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीमुळे आधीच संस्थाचालक आर्थिक अडचणीत असताना शासनाकडून मिळणारा तुटपुंजा परतावा देखील वेळेत मिळत नसल्याने संस्थाचालकांनी संताप व्यक्त केला. राज्याच्या शिक्षणमंत्री निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला आहे.

Tags:    

Similar News