Anil Parab ED Notice: अनिल परब यांना ईडीचा बुलावा, संजय राऊत यांची माहिती...
परिवहन मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस आली आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र
असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप अनिल परब यांच्यावर भाजपने केला होता. त्यांचा एक कथित व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओवर नारायण राणे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती.
मोदी मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्री झालेल्या नेत्यांची जनआशिर्वाद यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.