संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं वार्षिक अधिवेशन न्यूयार्क इथे पार पडलं. यात भारतासहित काही देशांना सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व मिळावं असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला. नव्यानं सदस्य होणाऱ्या देशांना 'नकाराधिकार' म्हणजे व्हेटो चा अधिकार नसेल असं अमेरिकेनं स्पष्ट केलं. भारताच्या विरोधात त्यांची ही भूमिका का आहे ? चीन पडद्यामागून कोणत्या हालचाली करतोय ? UN मध्ये आशियाई देशांना अशी सापत्न वागणूक का दिल जातेय ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची घेतलेली मुलाखत.