अलिबाग तालुक्यातील रेवदंडा या समुद्रकिनाऱ्यावर सरकारी जमिनीवर चाळीसहून अधिक स्थानिकांनी उभारलेल्या झोपड्या, राहूट्या आणि टेंट जेसीबी लावून अलिबाग तहसीलदारांनी तोडले आहेत. यात एक अनधिकृत घरही तोडण्यात आल्याचे समजते.
या कारवाईसाठी मोठा पोलीस फौजफाटा आणण्यात आला होता. पण प्रशासनाने या कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना स्थानिकांना दिली नव्हती असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एकीकडे अलिबाग, मुरुड समुद्रकिनारी धनदांडग्यांच्या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई होत नाही पण सामान्य स्थानिकांनी पर्यटनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कंबरडे मोडण्याचे शासन काम करीत आहे असा आरोप या लोकांनी केला आहे.