ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

Update: 2021-11-29 03:41 GMT

मुंबई // दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाच्या नव्या घातक ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सोबतच ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशीही चर्चा करणार आहे. सोबतच देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज बैठकीत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व विभागांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्यात.

कोविडच्या धोकादायक नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags:    

Similar News