Twitter Blue Tick : ब्लू टिक मिळालेले भ्रष्ट, एलन मस्कच्या ट्वीटमुळे नवा वाद

एलन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागण्याची घोषणा केली होती. त्यातच आता ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 8 डॉलर प्रति महिना द्यावे लागणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर एलन मस्क यांनी अनेक ब्लू टिक असलेले ट्विटर अकाऊंट remove करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यावेळी एलन मस्क यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.;

Update: 2022-12-13 05:37 GMT

Elon musk New Tweet : एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या ब्लू टिकसाठी (Paid for blue checl) पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता मस्क (Elon musk tweet) यांनी आणखी एक ट्वीट केले आहे.

पुढील काही महिन्यात सर्व ब्लू टिक रिमूव्ह करण्यात येणार असल्याचे ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Twitter CEO Elon Musk) यांनी ट्वीट करून जाहीर केले आहे. Mike Solana यांनी व्हेरिफाईडचा फोटो ट्वीट करून Ruthless म्हटलं होतं. त्यावर एलन मस्क यांनी रिप्लाय देतांना पुढील काही महिन्यात सर्व ब्लू टिक रिमूव्ह करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांना ज्या पध्दतीने ब्लू टिक देण्यात आल्या आहेत, ती पध्दती भ्रष्ट आणि मुर्खपणाची होती, असं ट्वीट एलन मस्क यांनी केलं आहे. त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी सचिव संजीव गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, एलन मस्क, बराक ओबामा, सचिन तेंडूलकर, president of india चे अधिकृत ट्विटर अकाऊंट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, एनडीटीव्हीच्या निधी राजदन हे सगळे भ्रष्ट आहेत का? असा सवाल केला आहे. तुम्ही जे आरोप सिध्द करू शकता तेच आरोप करा. भ्रष्टाचारामध्ये देण्याघेण्याचा विषय येतो. या सर्वांनी पैसे देऊन गैरमार्गाने ब्लू टिक मिळवली आहे, असं म्हणायचं आहे का? कारण @Verified ने स्वतः तपासणी आणि पडताळणी करूनच हे ब्लू टिक दिले आहेत.

@verified चं डोकं फिरलं आहे का? एलन मस्क वरील पोस्ट पहा आणि त्यात दुरुस्ती करा. तुम्ही ज्या व्यवस्थित पध्दतीने आणि घाईघाईने दिशानिर्देशांच्या केलेल्या अंमलबजावणीमुळे उद्भवलेल्या समस्यांवर प्रकाश टाकणारी पोस्ट डिबूस्ट करण्याऐवजी तुम्हाला अधिक वेळ आणि लक्ष देणारे चांगले अभियंते हवे आहेत. ओबामा सारखे लोक ही घोडचूक माफ करण्यासारखे नाहीत, असं म्हणत संजीव गुप्ता यांनी एलन मस्क यांच्यावर टीका केली आहे.

Elon musk, Elon musk new Tweet, Elon Musk relaunch twitter blue tick, Blue check, legacy blue check, Twitter india, Sanjiv Gupta, Narendra Modi, Barac Obama, Dropadi murmu, sachin tendulkar, paid twitter

Tags:    

Similar News