भीमा कोरेगाव प्रकरणाला जबाबदार ठरलेल्या एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या वरावरा राव यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने राव यांचे ८१ वर्ष वय आणि प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर वरावरा राव यांना जामीन मंजूर केला आहे. राव यांना २८ ऑगस्ट २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. राव यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
bhima koregaonपण राव यांची प्रकृती खराब असून तळोजा तुरुंग हॉस्पिटलमधील सुविधा त्यांच्या वयाच्या मानाने पुरेशा नसल्याचे सांगत कोर्टाने त्यांना ६ महिन्यांचा जामीन दिला आहे. याचिकाकर्त्यांचे वाढते वय आणि त्यांची होणारी गैरसोय पाहता त्यांना जामीन देण्यास पुरेसे कारण आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच मानवी हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेली एक संस्था म्हणून आणि घटनेच्या कलम २१ नुसार मिळालेल्या आरोग्य संऱक्षणाचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेता येणार नाही, असेही न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि मनीष पिटाळे यांनी म्हटले आहे.
राव यांनी सहा महिन्यांनतर जामीनला मुदतवाढ देण्यासाठी याचिका करावी किंवा शरणागती पत्करावी असेही कोर्टाने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी राव यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य करु नये तसेच याप्रकरणातील इतर आरोपींशी संपर्क करु नये अशा अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. या प्रकऱणाचा तपास करणाऱ्या NIAने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता.