एल्गार परीषद : रोना विल्सन यांना जामीन मंजूर
एल्गार परीषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या १६ आरोपींपैकी एक असलेले रोना विल्सन त्यांच्या वडीलांचे अंत्यसंस्कार विधीसाठी विशेष एनआयए कोर्टानं आज जामीन मंजूर केला आहे.
कायद्याअंतर्गत रोना विल्सन यांना जुलै २०१८ पासून अटक करण्यात आले आहे. यापूर्वी अनेकदा त्यांचा जामीन देखील नामंजूर करण्यात आला आहे.
१८ ऑगस्ट रोजी रोना विल्सन यांच्या वडीलांचे निधन झाले आहे. रितीरिवाजाप्रमाणे ३० दिवसानंतर अंतिम संस्कार विधी केले जातात. केरळमधील एका चर्चमधे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विल्सन यांनी मानवतेच्या दृष्टीने उपस्थितीसाठी जामीनाची मागणी केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने या जामीनासाठी विरोध करत रोना विल्सन यांचे कुंटुंबिय उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना सोडण्याची गरज नाही. अंतिम संस्कार देखील झाले आहे. त्यामुळे केवळ बाहेर पडून पुरावे नष्ट करणे हा त्यांचा उद्देश असेल असे कोर्टात सांगितले.
पुणे पोलिस आणि एनआयएने केलेल्या चौकशीत बंदी असलेल्या CPI(मोओईस्ट) या संस्थेशी त्यांचे संबध असल्याचे एनआयएने सांगितले. रोना विल्सन यांनी आर्सेनिकच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांच्या संगणकात आक्षेपार्ह कागदपत्रे टाकल्याचे कोर्टापुढे सांगितले होते.