सरपंचासह महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार; पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आदिवासी बहुल भागातील पांगरी येथील महिला – पुरुषांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.
नांदेड// नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आदिवासी बहुल भागातील पांगरी येथील महिला – पुरुषांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे. सरपंचासह महिलांनी दारूबंदीसाठी इस्लापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सावंत यांना निवेदन देत दारू बंदची मागणी केली आहे.
पांगरी या गावामध्ये रसायनमिश्रीत हातभट्टीसह, अवैध देशी-विदेशी दारू विक्री केली जात आहे. यामुळे या गावातील पुरुषांसह शाळकरी मुले देखील दारूच्या आहारी जात आहेत. अनेक महिलांचा संसार अक्षरश: उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावाच्या महिला सरपंच आदिमाया नरोटे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
जर रसायन मिश्रित हातभटी व अवैधरित्या देशी - विदेशी दारू विकणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर यापुढे आंदोलन तीव्र करू असा इशारा सरपंच आदिमाया नरोटे यांनी दिला आहे. महिलांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासन जबाबदार राहीस असा इशारा महिला आंदोलकांनी दिला आहे.