पुन्हा वीज दरवाढीचा शॉक ?

Update: 2023-03-07 09:24 GMT

आगामी एक एप्रिलपासून राज्यात विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात उन्हासोबत वीज दरवाढीच्या झळा सुद्धा सर्वसामान्यांना सोसाव्या लागणार आहेत. महावितरणने १ एप्रिलपासून आपल्या वीज ग्राहकांना झटका देण्याचे निश्चित केले असल्याचे दिसून येत आहे.


१ एप्रिलपासून महावितरण (Mahavitraan ) आपल्या विज दरामध्ये ३७ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीला सर्वोच्च न्यायालयामध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे ही दरवाढ करण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याचे बोलले जात आहे. अदानी पॉवर आणि जीएमआर आणि वरोरा यांच्याकडून महावितरण कंपनीला सर्वोच्च न्यायालयात हार पत्करावी लागली. त्याचा भूर्दंड आता सर्वसामान्य ग्राहकांना (Consumers) भोगावा लागणार आहे. या प्रकरणी न्यायालयाने महावितरणला हजारो कोटींचा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. या दंडाची रक्कम ग्राहकांकडून महावितरण (Mahavitraan ) वसूल करणार आहे.

अदानी पॉवर कंपनी आपल्या तिरोडा प्रकल्पातून महावितरणला विजेचा (Electricity ) पुरवठा करते. तिरोडा येथे अदानी पॉवर कंपनीचा ३३०० मेगावॅटचा प्रकल्प आहे. अदानी (Adani ) कंपनीला कोळसा कंपनीकडून आवश्यक कोळसा देता न आल्याने अदानीला कोळसा आयात करावा लागला. या कोळशासाठी अदानीला बरीच मोठी किंमत मोजावी लागली. त्यासाठी अदानीने महावितरणकडे अतिरिक्त पैशाची मागणी केली. ही मागणी महावितरणने (Mahavitraan ) मान्य केली नाही. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग लवादाकडून थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचले. पण प्रत्येक ठिकाणी महावितरणच्या पदरी अपयशच आले. त्याचप्रमाणे वरोरा येथे सुद्धा वीज संयंत्राचे संचालन करणाऱ्या जीएमआर कंपनीसोबतही महावितरणला हार मानावी लागली. त्यामुळे आता महावितरण समोर वीज दरवाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता या विज दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

कोळसा आयात धोरण २००७ आणि २०१३ च्या नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे ही दोन्ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात पोहचली होती. या काळात घरगुती कोळशाची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर उर्जा क्षेत्रात संशोधित नियमांची घोषणा करण्यात आली. अदानी पॉवरची महावितरणला १० हजार कोटींची देणी होती. ती महावितरणने याअगोदरच ग्राहकांकडून वसूल केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा महावितरण झटका देण्याच्या तयारित आहे. इंधन समायोजन शुल्कच्या नावावर ग्राहकांकडून (Consumers ) आता महावितरण पैसे वसूल करण्याच्या तयारित आहे. हा भुर्दंड ग्राहकांना आगामी काळात सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अदानी (Adani ) आणि महावितरणाच्या (Mahavitraan ) भांडणात ग्राहकराजा वीज बिलाने होरपळून निघणार आहे, हे मात्र निश्चित...      

Tags:    

Similar News