Electricity workers Strike वीज ही जनतेची हक्काची सेवा; खाजगीकरणाला आम आदमी पार्टीचा विरोध!
वीज ही जनतेच्या हक्काची असून व्यापक जनहितसाठी पुकारलेल्या वीज कामगारांच्या संपाला आपनं पाठिंबा दिला आहे. ठाणे नवी मुंबई पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आलेली आहे. हा वीज वितरणाच्या खाजगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने वीज कामगार याच्या विरोधात संपावर गेले आहेत. या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदारी कंपन्यांना प्रवेश दिल्याने क्रॉस सबसिडी म्हणजेच सार्वजनिक घरगुती व शेतीचा वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो. तसेच या खाजगी कंपन्या नफेखोरी करण्याचे उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनता या पायाभूत सुविधापासून वंचित राहू शकते.
यापूर्वीचा नवी मुंबईतील खाजगीकरणाबाबतचा अनुभव जनतेसाठी वेदनादायी ठरलेला आहे अवाजवी वीज दरवाढीचा मोठा फटका गरीब जनतेस बसतो. केंद्रातील मोदी सरकारने अनेक सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण केले आहे आणि विमानतळ ,टेलिफोन ,झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते आदी अनेक क्षेत्रांमध्ये अडाणी आणि अंबानी या मित्रांना नफेखोरीसाठी हे क्षेत्र खुले करून दिले आहे.
हा अनुभव पाहता आम आदमी पार्टी विज क्षेत्रातील खाजगीकरणाला विरोध म्हणून जनहितासाठी पुकारलेल्या या संपाला पाठिंबा देत आहे. त्याचवेळेस सर्वसामान्य जनतेस त्यांच्या हिताला आणि दर्जेदार सेवा देण्याला वीज क्षेत्रातील कर्मचारी अधिक प्राधान्य देतात हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न वीज क्षेत्रातील ट्रेड युनियननी करायला हवा असाही आग्रह आम आदमी पार्टी करते असे आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी म्हंटले आहे व याबाबतचे मागणी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.