५ राज्यात निवडणूका होणार का? आज होणार फैसला

Update: 2022-01-08 07:31 GMT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज ५ राज्याच्या निवडणुकांचा निर्णय घेतला जाणार आहे. आज निवडणूक आयोग दुपारी ३ः३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. देशात आगामी काळात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यात निवडणूका होणार आहेत. मात्र, देशात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना नेत्यांच्या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूका पुढं ढकलण्यात याव्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय पक्षांना आणि निवडणूक आयोगाला केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश चा दौरा केला होता.

यावेळी निवडणूक आयोगाने विविध पक्षाच्या प्रतिनिधींशी देखील बातचीत केली होती. तसंच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाला देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत माहिती सादरीकरण केलं होते. यावेळी भूषण यांनी ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्या राज्यातील कोविड स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला दिली. त्यानंतर आज शनिवारी निवडणूक आयोग ५ राज्याच्या निवडणूकांसंदर्भात निर्णय घेणार आहे.

Tags:    

Similar News