एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यावरून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत सस्पेन्स ठेवला होता. ऐन शपथविधीच्या वेळेपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री नाही तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. आमदारांच्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे हे शपथ घेण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माजीमंत्री उदय सामंत हे राजभवनावर दाखल झाले आहेत. काही क्षणात एकनाथ शिंदे देखील राजभवनावर दाखल होतील अशी माहिती आहे…
#eknathshinde #udaysamant #mahayuti #oathceremony #marathinews