६ महिने में मुंबईको चमका दिया - एकनाथ शिंदे

Update: 2023-01-19 14:00 GMT

``आम्ही रस्ते बांधतोय त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायला लागले आहे. पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. लोकांचे जीवन सुसह्य होईल. यात काही लोक खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करुद्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करु, २० वर्ष काही करु शकले नाही पण आम्ही ६ महिने में मुंबईको चमका दिया,``असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन झाले. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडला. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकाची सुमनं उधाळत महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

"काही लोकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कुणाचही चालत नाही. आमची इच्छा होती, महाराष्ट्र आणि मुंबईकरांची इच्छा होती. म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे उपस्थित आहेत.", असे एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.

मविआ सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला? हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाली. मी जेव्हा मोदींना पाहतो, त्यांची भेट घेतो. तेव्हा माझ्या मनात एक पवित्र भावना निर्माण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी आहे, जे आम्हाला ऊर्जा देतं. आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी, अशीच आहे, असे शिंदे म्हणाले.

मुंबईत ४०० किमींचे काँक्रिटचे रस्ते आम्ही तयार करत आहोत. त्याचेही भूमिपूजन आज मोदीजी करणार आहेत. आम्ही रस्ते बांधतोय त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायला लागले आहे. पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. लोकांचे जीवन सुसह्य होईल. यात काही लोक खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करुद्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करु. दरवर्षी जे खड्ड्यातून प्रवास करतायत आणि जे लोक खड्ड्यातून कमविण्याचे काम करत होते, त्यांनाच हे काम नको होते. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पाढंरं करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, हे विरोधकांचे दुःख आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्याहस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्वाचा अभिमान या दोहोंच्या विचारांचा पाया होता. पंतप्रधान यांचे मुंबईकरांच्यावतीने स्वागत करतो. ते आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो." मी नुकसात दावोसला जाऊन आलो.. मोदी किती लोकप्रिय आहेत हे परदेशात समजते असे शिंदे म्हणाले,

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत. मात्र, लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे. २०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदललं.तसेच पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं आवाहन केलं."

"मोदींच्या विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिलं. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

"असं असलं तरी आमचं पुन्हा सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे. मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं," असं फडणवीसांनी सांगितलं.tags असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन झाले. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडला. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकाची सुमनं उधाळत महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

"काही लोकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कुणाचही चालत नाही. आमची इच्छा होती, महाराष्ट्र आणि मुंबईकरांची इच्छा होती. म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे उपस्थित आहेत.", असे एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.

मविआ सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला? हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाली. मी जेव्हा मोदींना पाहतो, त्यांची भेट घेतो. तेव्हा माझ्या मनात एक पवित्र भावना निर्माण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी आहे, जे आम्हाला ऊर्जा देतं. आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी, अशीच आहे, असे शिंदे म्हणाले.

मुंबईत ४०० किमींचे काँक्रिटचे रस्ते आम्ही तयार करत आहोत. त्याचेही भूमिपूजन आज मोदीजी करणार आहेत. आम्ही रस्ते बांधतोय त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायला लागले आहे. पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. लोकांचे जीवन सुसह्य होईल. यात काही लोक खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करुद्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करु. दरवर्षी जे खड्ड्यातून प्रवास करतायत आणि जे लोक खड्ड्यातून कमविण्याचे काम करत होते, त्यांनाच हे काम नको होते. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पाढंरं करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, हे विरोधकांचे दुःख आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्याहस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्वाचा अभिमान या दोहोंच्या विचारांचा पाया होता. पंतप्रधान यांचे मुंबईकरांच्यावतीने स्वागत करतो. ते आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो."

मी नुकसात दावोसला जाऊन आलो.. मोदी किती लोकप्रिय आहेत हे परदेशात समजते असे शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत. मात्र, लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे. २०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदललं.तसेच पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं आवाहन केलं."

"मोदींच्या विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिलं. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

६ महिने में मुंबईको चमका दिया - एकनाथ शिंदेअसं फडणवीसांनी सांगितलं.

Tags:    

Similar News