मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत...

Update: 2022-08-04 09:50 GMT

मोठी अपेक्षा लागलेला सुप्रिम कोर्टाचा निकाला लांबल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला असतानाचा गेली एक महीना अविरत दिल्ली- महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तब्बेत बिघडली आहे. अतिताणामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती दिली असून त्यांनी आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. दुसऱ्या बाजुला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर पोचले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे त्यांनी सर्व प्रशासकीय बैठका रद्द करून आराम करायचे ठरवले आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सर्व बैठका रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.

२० जून रोजी बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड व्यस्त झाले होते. सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग मुंबई असे दौरे करून त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतरही त्यांचे अनेकवेळा दिल्ली दौरे झाले. दरम्यान, राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

त्यातच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांचे मतदारांसघात यशस्वी निष्ठा यात्रा घेत आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शिवसना कार्यकर्ते मेळावेही घेत होते. या काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरे करून आढावा बैठक घेत विविध निर्णय घेतले. त्यातच, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरच संपूर्ण राज्याची मदार आहे. या सर्व घटनांमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे त्यांनी आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करून एक दिवस आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रम आणि बैठका रद्द करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. महिना उलटून गेला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सुप्रिम कोर्टानंही सोमवार पर्यंत सुनावणी लांबल्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार आणि एकंदरीत राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Tags:    

Similar News