खडसेंच्या गाडीचा अपघात, नेटकऱ्याने करुन दिली गोपिनाथ मुंडेच्या अपघाताची आठवण

खडसेंच्या गाडीचा अपघात, नेटकऱ्याने करुन दिली गोपिनाथ मुंडेच्या अपघाताची आठवण, काय म्हटलंय नेटिझन्सनी;

Update: 2020-11-02 03:12 GMT

भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मोटारीचा अपघात झाला. एकनाथ खडसे हे अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचा टायर फुटला. या संदर्भात खडसे यांनी ट्विट करत आपण सुखरुप असल्याचं सांगितलं...



आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.

असं खडसे यांनी ट्विट केलं आहे.

या ट्विटला नेटिझन्स प्रतिक्रिया दिल्या आहेत..

सराफ तनुज यांनी आपण खानदेशातील एकमेव मोठे नेते आहात जे खान्देश ला देशात मोठा स्थान देऊ शकतात काळजी घ्या खडसे साहेब. असं म्हणत ट्विट केलं आहे.



तर प्रशांत पाटील यांनी रात्र वैऱ्याची आहे. काळजी घ्या असा सल्ला दिला आहे.




 तर मुरली यांनी... साहेब काळजी घ्या ! राजकारणात विरोधी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मुंडे साहेबांचा अपघात तर आपणास माहिती आहे. काळजी घ्या, आणी शक्यतो प्रवास कमी ठेवा सध्या. आम्ही जास्त सांगणं चुकीचं आहे कारण आपणास अनुभव प्रचंड आहे. काळजी घ्या असं ट्विट केलं आहे.





भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचा दिल्ली मध्ये अपघात झाला होता. या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. हा उपघात नसून हा अपघात घडून आणला गेला. असा अनेकदा आरोप केला जातो.

Tags:    

Similar News