निखिल खडसेंच्या आत्महत्येची चौकशी करा, राष्ट्रवादीच्या स्थानिक मागणी, खडसेंवर गंभीर आऱोप

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्याची चर्चा असताना आता खडसेँवर त्यांच्या मुलाच्या आत्महत्येसंदर्भात राष्ट्रवादीच्याच एका स्थानिक नेत्याने गंभीर आऱोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Update: 2020-12-26 03:13 GMT

गिरीश महाजन यांच्या गैरकृत्यांचे पुरावे मिळवण्यासाठी एकनाथ खडसे BHR चौकशीचा बहाणा करून पुणे गुन्हे अन्वेषण विभागामार्फत आपले मित्र आणि परिवारावर धाडी टाकून कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जळगावातील नेते प्रफुल्ल लोढा यांनी केला आहे. लोढा यांनी पत्रकार परिषदेत खडसेंवर अनेक गंभीर आरोपही केले आङेत. लोढा यांनी खडसे यांचा मुलगा निखिल खडसे यांच्या 10 वर्षपूर्वी झालेल्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणीही केली. स्वत:चा मुलगा निखिल खडसे यांचा बळी खडसेंनी आपल्या राजकारणासाठी घेतला असल्याचा आऱोपही लोढा यांनी केला आहे.

प्रफुल्ल लोढा पूर्वी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते होते, मात्र ऐन निवडणुकीच्या काळात लोढा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच महाजन यांचा गैरकृत्याची CD आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. तोच धागा पडून एकनाथ खडसे यांनी एका मंत्र्यांची आणि PA ची आपल्याकडे CD आहे असे वक्तव्य केले होते. मात्र आता हीच CD मिळवण्यासाठी खडसे हे पोलिसांचा वापर करून BHR पतसंस्थेच्या नावाखाली औरंगाबादच्या मित्राच्या घरी आणि माझ्या मुंबईतील घराची झडती घेतली व काही साहित्य नेलं तसंच पोलीस CD ची मागणी करत असल्याचा आरोपही लोढा यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनाही अंधारात ठेऊन राजकीय फायद्यासाठी BHR पतसंस्थेच्या माध्यमातून एकमेकांना अडचणीत आणण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही लोढा यांनी केला.

लोढा यांनी गिरीश महाजन तसेच त्यांचे PA रामेश्वर नाईक यांच्यावरही गंभीर आरोप केले. माझ्याकडे अनेक फाईल्स आहेत मात्र योग्य वेळी मी लोकांसमोर आणेल असा दावा लोढा यांनी केला.

Tags:    

Similar News