विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात ईडीची तक्रार ; 560 कोटींचा अपहार केल्याचा आरोप

Update: 2021-08-13 05:53 GMT

पनवेल :पनवेलमधील कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि बँकेचे माजी संचालक विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात ईडीने तक्रार दाखल केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड मधील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप विवेकानंद पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पाटील यांनी अपहार करून ही रक्कम स्वतःच्या खात्यांवर वळवल्याचे ईडीच्या तक्रारीत म्हंटले आहे.



ईडीनं केलेल्या तपासात पाटील यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. 2019 साली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याचा ईडीने तपास केला . सोबतच 2019-20 मध्ये बँकेचे ऑडिट करण्यात आलं. यामधून मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर झाल्याचे समोर आले . विवेकानंद पाटील यांनी बँकेतील पैसे कर्जाच्या स्वरूपातील रक्कम वेगवेगळ्या 63 खात्यांवर वळवल्याचे ईडीने केलेल्या तपासात समोर आलं. यातील बरीच बँक खाती ही विवेकानंद पाटील यांच्या वैयक्तिक मालकीची असून, काही बँक खाती त्यांचा प्रभाव असणाऱ्या संस्थांची होती असं या तक्रारीत म्हंटले आहे.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी यासारख्या खात्यांवर कोट्यवधी रुपये वळवण्यात आले आहे.रक्कमतून शाळा, कॉम्पेक्स यासारख्या वैयक्तिक वास्तूंची उभारणी करण्यात आली असं ईडीनं म्हटलं आहे. दरम्यान हा घोटाळा 2008 सालापासून सुरु असल्याचं देखील ईडीने म्हंटल आहे. ही अफरातफर तब्बल 560 कोटींची असल्याचा दावा ईडीनं प्राथमिक केला आहे.

Tags:    

Similar News