देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढवणाऱ्या सतिश उकेंच्या घरी ईडीच्या धाडी
गेल्या काही दिवसात राज्यात ईडीच्या कारवायांना वेग आला आहे. त्यामुळे भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक असलेले सतिश उकेंच्या घरावर ईडीने धाडी टाकल्याने नागपुरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.;
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात ईडीच्या धाडी सुरू आहेत. त्यामुळे भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक असलेल्या सतिश उकेंवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे नागपुर शहरात खळबळ उडाली आहे.
Adv. सतिश उके यांनी विविध प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच अनेक प्रकरणांमध्ये सतिश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. तसेच जस्टीस लोया, लिमगडे हत्याकांड, चंद्रशेखर बावनकुळे भ्रष्टाचार प्रकरण यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. त्यातूनच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
काय आहे प्रकरण :
सतीश उके पार्वतीनगर भागात राहतात. त्यांच्या घरावर ईडीने पहाटे पाचच्या सुमारास धाड टाकली. तर उके यांना काही दिवसांपुर्वी सतिश उके यांना गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती. त्याप्रकरणी तसेच मनी लाँडरिंगप्रकरणी सतिश उके यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.
नाना पटोले यांच्याकडून सतिश उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची केस लढवली होती. तसेच 2014 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटले लपवल्याप्रकरणी सतिश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणांमुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले होते. त्यामुळेच सतिश उके यांच्यावर कारवाई केल्याची चर्चा रंगली आहे.