महाराष्ट्रात ED पुन्हा सक्रीय, दाऊदशी संबंधित प्रकरणी धाडसत्र

Update: 2022-02-15 07:12 GMT

मुंबई : 1993 च्या साखळी बाँबस्फोटातील आरोपी अबू बकरला 29 वर्षांनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी युएईतून अटक केली. त्यानंतर दाऊदशी संबंधीत प्रकरणात ईडीच्या कारवाईला वेग आला आहे. तर या प्रकरणात महाराष्ट्रातील एक मंत्री सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. त्यामुळे मुंबईत मोठा धमाका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा सुत्रधार दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या अबू बकरला युएईतून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदशी संबंधीत असलेल्या प्रकरणांमध्ये कारवाईला वेग आला आहे. त्यातच मंगळवारी मुंबईत विविध ठिकाणी दाऊशी संबंधीत असलेल्या प्रकरणांमध्ये ईडीने छापे टाकले तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याची चौकशी ईडीने केली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

भारतातून 1980 च्या दशकात भारतातून परदेशात गेलेला दाऊद देशात आर्थिक व्यवहार कसे करतो, असा प्रश्न तपास यंत्रणांपुढे होता. मात्र मुंबईतील डी गँगचा संबंध पंजाबपर्यंत आहे, अशी धक्कादायक माहिती गेल्या काही दिवसात समोर आली. त्यानुसार दाऊदचे मुंबई ते पंजाबमार्गे पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी कनेक्शन असल्याचे समोर आले. तर दाऊद आयएसआयच्या माध्यमातून पंजाबमध्ये दहशत पसरवत असल्याची शक्यता समोर आली. त्यापाठोपाठ भारतीय तपास यंत्रणांनी 1993 सालच्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील फरार असलेल्या आरोपी अबू बकरला युएईतून अटक केली. त्यापाठोपाठ ईडीने दाऊदशी संबंधीत प्रकरणांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणात एका मंत्र्याची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Tags:    

Similar News