रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी

Update: 2024-02-01 04:42 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा प्रवर्तन संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होणार आहे. गेल्या आठवड्यात पवार यांची चौकशी 12तासापर्यंत सुरू होती. आजच्या चौकशीत ईडी पवार यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत अधिक माहिती घेण्याची शक्यता आहे.

ईडीने पवार यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली चौकशी चालू आहे. रोहित पवार यांच्यावर बारामती agro कंपनी संबंधी आरोप आहे की,या पैशाचा वापर त्यांनी इतर उद्देशांसाठी केला असल्याचा आरोप आहे.




 

पवार यांनी या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणतात की, त्यांच्यावर बेकायदेशीर आरोप लावले जात आहेत. त्यांनी या प्रकरणात आपली निर्दोषता सिद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पवार यांची आज होणारी चौकशी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची आहे. या चौकशीतून पवार यांच्यावर ठपका ठेवला जाऊ शकतो.

शरद पवार गटाचे ठिकठिकाणी आंदोलनाचे आयोजन

आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून राज्यातील सरकारी कार्यालय बाहेर आंदोलन करणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बेलार्ड इस्टेट येथील कार्यालयबाहेर जमा होण्यास सुरुवात होत आहे. 

Tags:    

Similar News