सतिष उकेंना 6 एप्रिल पर्यंत ED कोठडी

Update: 2022-04-01 12:54 GMT

फडणवीसांवर आरोप करणारे नागपूर स्थित वकील सतिष उके यांना सक्तवसुली संचालनालय आजच्या विशेष कोर्टाने सहा एप्रिल पर्यंत ED कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ईडीने उके यांच्यासह त्यांचे बंधू प्रदीप यांना गुरूवारी अटक केली होती.

त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाची माहिती न्यायालयात देण्यात आली. जमीन गैरव्यवहार प्रकरणात दोन गुन्हे नोंदवले गेले आहे. खैरूनिसा शेख या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यावर त्या महिलेवर दबाव टाकून महिलेच्या पतीने उकेंशी व्यवहार केला हे मान्य करण्यास सांगितले. यांसह विविध प्रकरणात आरोपीची कोठडी मिळून तपासाची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. न्यायालयाने तो मान्य करत सहा एप्रिल पर्यंत ED कोठडी दिली आहे.

सतीश उके याच्यावतीने त्यांचे वकिल रवी जाधव या़नी ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. उके हे व्यवसायाने वकील आहेत. अटकेनंतर उकेंना 24 तासात कोर्टात हजार करणे गरजेचे असताना ईडीने तसे केले नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ते ईडीचे अधिकारी पाळत नाहीत. अटकेचा मेमोही अद्याप दिलेला नसल्याचा युक्तीवाद जाधव यांनी केला. उके यांनीही स्वत: आपली बाजू मांडली.

माझा घरात मी झोपेत असताना बेडरूम मध्ये सीआरपीएफचे जवान AK 47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. मी आधी आर्किटेक्ट होतो नंतर कायद्याचं शिक्षण घेऊन 2007 साली वकिली सुरू केली. मी फडणवीस आणि गडकरी यांच्या विरोधात खटले लढले आहे. माझ्यावर लोया यांच्या केस मध्ये दबाव टाकला गेला. मला फडणवीस यांच्या सहकाऱ्याने धमकावले, असा आरोप उके यांनी केला. यावेळी युक्तीवाद करताना उके यांना न्यायालयात रडू कोसळले होते.

दरम्यान, प्रदीप उके हे माजी पोलीस कर्मचारी असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयातील माजी न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. तसेच उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

फडणवीस यांना नागपूर विमानतळावर पत्रकारांनी उके प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. "मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, एका जमीनीच्या प्रकरणामध्ये नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल केलेला. त्या तक्रारीवर ईडीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मूळ तक्रार, मूळ कारवाई आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे. त्यावर आधारितच कारवाई ईडीने केलीय," असं फडणवीस म्हणाले.

नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापा टाकला होता. या प्रकरणावरुन आता राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालेलं असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये या प्रकरणावर भाष्य केलंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणासंदर्भात काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, एक प्रकारे देशात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आहे असं वक्तव्य केलेलं.

फडणवीस यांना नागपूर विमानतळावर पत्रकारांनी उके प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. "मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, एका जमीनीच्या प्रकरणामध्ये नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल केलेला. त्या तक्रारीवर ईडीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मूळ तक्रार, मूळ कारवाई आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे. त्यावर आधारितच कारवाई ईडीने केलीय," असं फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस यांनी उके यांच्यासंदर्भातील आधीच्या प्रकरणांचा उल्लेख केला. "सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की त्यांच्याविरोधात २००५ पासून वेगवगेळे एफआयआर आहेत. वेगवेगळ्या न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याबद्दल त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झाला. त्यांनी त्यांना शिक्षा केली. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशाप्रकारचा निर्णय दिलीय. आता सर्वोच्च न्यायालयात ते प्रलंबित आहे. त्यांना न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणीही शिक्षा झालेली आहे," असं फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे सतीश उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते.

बेकायदा दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी आपण आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अ‍ॅड्. सतीश उके हे या प्रकरणातील आमचे वकील आहेत. परंतु अचानक त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकून फाइली, लॅपटॉप, मोबाइल जप्त केले आहेत. उके हे न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूसह इतर प्रकरणावरही काम करत आहेत. त्यांचा आवाज दडपण्यासाठीच ही कारवाई केली आहे. हा एकटय़ा उके यांचा प्रश्न नसून भाजप सरकारच्या विरोधात कोणीही आवाज उठवला तरी त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असं पटोले यांनी कालच उके प्रकरणाबद्दल बोलताना म्हटलं होतं. दरम्यान नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सतीश उके यांच्या अटकेचा निषेध केला आहे.

Tags:    

Similar News