#ED च्या केसमध्ये गेल्या 17 वर्षात फक्त 23 प्रकरणात शिक्षा

Update: 2022-07-27 13:10 GMT

आजच सर्वोच्च न्यायालयात इडीच्या अधिकारांवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने इडीचे अधिकार कायम ठेवले आहेत. गेल्या काही वर्षात इडीचं नाव तुमच्या सातत्याने कानावर पडत आलं आहे. मात्र, इडीच्या या सर्व प्रकरणांमध्ये किती लोकांना सजा सुनावली गेली आहे. तुम्हाला माहिती आहे का?

ED अर्थात अंमलबजावणी संचालनायलयाने गेल्या 17 वर्षात 5 हजार 400 केस दाखल केल्या आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ 23 जणांना दोषी ठरवले आहे, सरकारने सोमवारी संसदेत दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2022 पर्यंत, अंमलबजावणी संचालयाने (ईडी) पीएमएलए अँक्ट अंतर्गत 5 हजार 422 प्रकरणे नोंदवली आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. पीएमएलए कायदा (इडी) 2002 मध्ये लागू करण्यात आला तर 1 जुलै 2005 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली.इडीने आत्तापर्यंत सुमारे 1 लाख 4 हजार 702 कोटी रुपयांची मालमत्ता Attach केली आहे. तर दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी 992 प्रकरणांमध्ये इडीने आरोपपत्र दाखल केलं आले. या कालावधीत 869.31 कोटी रुपयांची मालमत्ता इडीने जप्त केली असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

गेल्या 10 वर्षांत, ED ने 2021-22 या आर्थिक वर्षात सर्वाधिक मनी लाँडरिंग आणि परकीय चलन उल्लंघनाच्या प्रकरणांची नोंद केली आहे. यामध्ये ED ने पीएमएलए कायद्या अंतर्गत 1,180 तर फेमा कायद्याअंतर्गत 5,313 तक्रारी दाखल केल्या आहेत.

Tags:    

Similar News